२०११ साली जन्माला आलेली रश्मिन चळवळ आता नेदरलँड्स मराठी मंडळाच्या रूपात आपल्यासमोर उभी राहिली आहे.

मंडळाची विचारधारा

भारतापासून दूर राहताना “अमृताशी देखील पैजा जिंकणाऱ्या” आपल्या मराठी भाषेविषयी,  कलेविषयी,  संस्कृतीविषयी प्रत्येकाच्या मनात एक ओढ असते, पण ती व्यक्त करण्याकरिता एक साधन लागतं; एक संधी लागते; आणि तीच संधी सगळ्या हॉलंडस्थित मराठी माणसांना मिळावी आणि या सामुदायिक साहचर्यातून, मराठी लोकांचे सांस्कृतिक एकत्रीकरण व्हावे, या उदात्त विचारातून २०११ मध्ये ‘रश्मिन’ कलोपासक समूहाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. २०१५ साली महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘रश्मिन’ संस्कारित “नेदरलँडस् मराठी मंडळ” आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो.

प्रायोगिक, सृजनशील आणि कलात्मक कार्यक्रम, नृत्य, नाट्य, संगीत, कला, साहित्य आणि सामाजिक जाणिवा अशा विविध क्षेत्रांत ‘रश्मिन’ चळवळ रुजली आहे. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत इत्यादींच्या मैफिलींसह संगीताची ही वाटचाल निरंतर चालू आहे. नाटक आवडत नाही असा मराठी माणूस विरळाच!!! आणि म्हणूनच ‘रश्मिन’ने हॉलंडमध्ये “नाट्यधारा” हा अनोखा कलाविष्कार यशस्वीरीत्या सुरु केला! संगीत नाटक, विनोदी नाटक, आणि विविध आशयघन कलाकृतींच्या नाट्याविष्काराने अखिल मराठी प्रेक्षक हुरळून जातो. मराठी चित्रपटांचा प्रसार आणि त्यांची प्रसिद्धी करण्यामध्ये नेदरलँडस् मराठी मंडळाचा हातभार लागत आहे याचा ‘रश्मिन’ला अभिमान आहे. चित्रपटांबरोबर सुप्रसिद्ध मराठी कलाकारांना भेटण्याच्या, त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याच्या विविध संधी आम्ही हॉलंडस्थित मराठी मित्र-मैत्रिणींसाठी यापूर्वीही घेऊन आलो आणि यापुढेही आणत राहू.

ज्या माय-मराठीमुळे आपले अस्तित्व आहे, त्या भाषेची सेवा केल्याशिवाय ही सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ पूर्ण होऊच शकत नाही आणि म्हणूनच मातृभाषेचे योग्य महत्त्व जपण्यासाठी व टिकवण्यासाठी गेली चार वर्षे सातत्याने ‘रश्मिन’ चा दिवाळी अंकाचा प्रकल्प यशस्वीरीत्या चालू असून केवळ युरोपातीलच नव्हे तर विविध युरोपियन देशांतील मराठी बांधव यात सक्रिय सहभाग घेत आहेत, याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो.

परदेशातील मराठी मंडळांचा उद्देश केवळ मनोरंजन नसून, त्याही पुढे जाऊन भारत अथवा महाराष्ट्रस्थित समाजाचा आर्थिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास घडवण्यास मदत करणे हा असावा. याच सामाजिक जाणिवेतून, ‘रश्मिन’ संस्कारित नेदरलँडस् मराठी मंडळ सामाजिक क्षेत्रातदेखील विविध उपक्रमांद्वारे मार्गक्रमण करीत आहे. एका लहान रोपट्याचे अशा एका मोठ्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळरुपी वटवृक्षात रुपांतर होताना बघून ‘रश्मिन’ ला अभिमान वाटतो.

आत्तापर्यंतच्या वाटचालीत आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. ‘रश्मिन’ समूहाच्या नेदरलँडस् मराठी मंडळात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यास आपणास नक्कीच आनंद होईल. आपणा सर्वांना नेदरलँडस् मराठी मंडळाचे सदस्य होण्याचे जाहीर आवाहन आम्ही करीत आहोत.

Upcoming Cultural Fests

ती होती… ती आहे …आणि ती राहणार!☺️
छे, ती कसली जातेय, ती तर तुमच्या आमच्या मनामनात, स्पंदनात भरभरून आहे… वाहते आहे, हो ना? 😉
होय, तीच ती नाट्यधारा … आणि तो अनोखा प्रकार ”थिएटर ऑफ Absurd” इथेच जवळ आले आहेत ♥️
आणि हो, “ती” यावेळी येते आहे दोन प्रतिभावान रंगकर्मींना घेऊन… एक गोड जोडी, आपलेच सखी आणि सुव्रत!!!😍
तर या विशेषत्वाने नटलेल्या “ती”ला आपलंसं करायला, “ती”च्या वरचं तुमचं भरभरून असलेलं प्रेम ओसंडून वाहायला आणि “ती”च्या बरोबर एका वेगळ्या विश्वात समरसून जायला… येताय ना?
आणि हो, तारखा विसरू नका!
वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे फेब्रुवारी मधील अनोखे २ दिवस … १५-१६ फेब्रुवारी २०२५🔥
तुमच्या मनामनातली,
“ती’च
नाट्यधारा २०२५!♥️
साडे-तीन मुहूर्तांपैकी एक, गुढी पाडव्याच्या ह्या पहिल्या पूर्ण मुहूर्तावर आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक “स्वर-पर्वणी”
*महेश काळे Live in Concert – अभंगवारी*
स्थळ: Hal60, Pasteurweg 60, 2371DW, Roelofarendsveen, (Near Leiden, besides A4)
दिनांक: ३० मार्च २०२५
वेळ: १५:३० वा.
हा नव-वर्षोत्सव, वसंतोत्सव “गुढी पाडवा” संस्मरणीय होणार यात यत्किंचित शंका नाही!
*Special Discount: Everyone attending *“Natyadhara-2025”*
नमस्कार!
दरवर्षीप्रमाणेच यंदाही आपण, नेदरलँड्स मराठी मंडळ परिवार, जल्लोषात गणेशोत्सव साजरा करणार आहोत!
बाप्पाच्या स्वागताला ढोल-ताशा-ध्वज-बरची पथक सोबत आहेच!
तारीख – ६ ऑगस्ट २०२५

नेदरलँड्स मराठी मंडळ – नाट्य कार्यशाळा आणि संस्कृती जपण्याचा वसा

नेदरलँड्स मराठी मंडळ हे मराठी संस्कृती जपण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. आपल्या मराठी परंपरेतील एक महत्त्वाचा ठेवा म्हणजे नाटक, आणि याच ठेव्याला साजेसं स्थान देण्यासाठी मंडळ दरवर्षी विशेष नाट्य कार्यशाळांचं आयोजन करतं.

 

कार्यशाळेतील अनुभव केवळ रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकापुरता मर्यादित राहत नाही, तर त्यातून मराठी भाषा, साहित्य, आणि विचारांचेही बीज नवीन पिढीत रुजते. या माध्यमातून नेदरलँड्समधील मराठी समुदाय आपली ओळख टिकवून ठेवत आहे आणि नवीन पिढीपर्यंत आपल्या समृद्ध वारशाचा वारसा पोहोचवत आहे.

नेदरलँड्स मराठी मंडळाच्या या अनोख्या उपक्रमामुळे नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, मराठी संस्कृती जपण्याचा एक सशक्त माध्यम ठरले आहे.

नेदरलॅंड्स मराठी मंडळाच्या वार्षिक परंपरेचा एक अविभाज्य घटक- “रश्मिन” दिवाळी अंक! यंदा डिजीटल स्वरूपात…
चला, लागा मग तयारीला…आपले साहित्य लवकरात लवकर पाठवा!

नेदरलॅंड्स मराठी मंडळात सामील व्हा

आम्हाला फॉलो करा

Facebook आणि Instagram वर NMM ला फॉलो करून सर्व नवीन कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती मिळवा

सदस्य बना

मंडळाचे मेंबर बनून मंडळाच्या सर्व कार्यक्रमांसाठी सवलत मिळवा. केवळ मेंबरशिप द्वारे तुम्ही मंडळाच्या पुढील कार्यक्रमांना हातभार लावू शकता.

व्हॉटसॅप ग्रुप

मंडळाचा Whatsapp ग्रुप हा सर्वांसाठी खुला आहे. Whatsapp ग्रुप मध्ये सामील होऊन संवादात भाग घ्या

कार्यकारिणी समिती २०२४-२५

अध्यक्ष

वेदांग रानडे

उपाध्यक्ष

हर्षल संतान

सचिव

केतकी आपटे

खजिनदार

श्रेयश पालांडे

व्यवस्थापन

ऋषिकेश जोशी

मीडिया व प्रमोशन

केतकी देशपांडे

संवेदना

ईशान किंजवडेकर

क्रीडा

परीक्षित निकुंभ

सोशल मीडिया

सचिन अनगळ

नेदरलँडस मराठी मंडळात सामील व्हा

12 + 12 =